Description
बहुआयामी व्यक्तिमत्व असणारे सामाजिक बांधिली जपणारे, समाज आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्याशिवाय खरी प्रगति होणार नाही या धारणेतुन बुवकवर्गाला तसेच महिला वर्गाला व्यवसायामध्ये प्रवेश करण्यासाठी, उद्योग धंदा सुरु करण्यासाठी सतत प्रोत्साहित करुन, त्यांच्या आर्थिक उन्नतीमध्ये हातभार लावण्यासाठी इंडियन चेंबर्स अँड कॉमर्स अफर्मेटिव्ह अॅक्शन या भारत सरकारच्या कंपनी अफेअर्स मंत्रालय प्रभाग ८ च्या अंतर्गत (इक्का) या संस्थेची स्थापना केली व त्याद्वारे महिला व युवा उद्यमीची साखळी तयार झाली. सामाजिकदृष्ट्या मागास वर्गासाठी विशेष शासकीय योजनाचा पाठपुरावा करून त्यांच्यापर्यंत योजनांचे फायदे पोहचविण्याचे कार्य या संस्थेद्वारे सुरु आहे. महिलावर्गास उद्योग प्रशिक्षण मिळवून देवून. कर्जाची व्यवस्था करून त्यांचा उद्योग सुरू करून देवून, त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे कार्य इक्का करीत आहेत. आरोग्य सेवेविषयी विशेष आस्था ठेवून लॉयन्स क्लब मुंबई आयलंड व रोटरी क्लब ऑफ मुंबई, खार या संस्थेमार्फत रक्तदानापासून अवयव दानापर्यंत तसेच शैक्षणिक साहित्य गरजूपर्यंत पोहचविणे, आर्थिकदृष्ट्या कमकुवत विद्यार्थ्यांना शिक्षणात मदत करण्याचे कार्य वाखाणण्यासारखे आहे. सहारा प्रतिष्ठान संस्थेतर्फे शाळा बाह्य मुलांना पुन्हा शाळेत प्रवेश देऊन त्यांना मदत करणे. महिला कल्याणच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहचवून रोजगार निर्मित करून त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्याचे काम, बाल
कामगार पुनर्वसनाचे काम सहारा प्रतिष्ठान मार्फत ते करीत आहेत.
Additional Information
Publications : सुगावा प्रकाशन ( Sugava Prakashan )
Author : सुनील झोडे ( Sunil Zode )
Binding : Hard Cover
ISBN No : 9788197446900
Language : मराठी ( Marathi )
Weight (gm) : 322
Width : 14
Height : 2
Length : 22
Edition : 01
Pages : 200