Description
माझी मुक्ताई, मुक्ताई दहा वरसाचं लेकरू..
बहिणाबाईनी लिहलेली ही कविता मला कधी ज्ञानेश्वर माऊलीने तर कधी विठू माऊलीने लिहल्या, गायल्यासारखे वाटते. मुक्ताबाई या संत ज्ञानेश्वर माऊलींच्या बहीण. निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, सोपानदेव, मुक्ताई यांची परवड झाली. हेटाळणी झाली. त्यांना वाळीत टाकले.. पण आंतरिक सन्मान जागा ठेवून यांनी आपली विद्वत्ता सिद्ध केली.
आई-वडिलांचे छत्र नाही, वर ही सामाजिक अपमानाची झळ पाहून ज्ञाना माऊली ताटी लावून बसले. खरंतर लटका राग धरण्याचे ते वय.. मात्र अकाली आलेले प्रौढत्व आणि त्यातच समाजउद्धारासाठी निघालेली ही बालके सर्वसाधारण नव्हतीच. तेव्हा ताटीचे अभंग सांगत मुक्ताईंनी अधिकारवाणीने समजूत घातली. हृदयाचा ठाव घेणाऱ्या एका एका अभंगात साक्षात पांडुरंग ही अवतरतो, असे बहिणाबाईना वाटते. त्या म्हणतात,
घेती हिरीदाचा ठाव, ऐका ताटीचे अभंग एका एका अभंगात, उभा केला पांडुरंग ।।५।।
संत मुक्ताबाई आणि माझी मुक्ताई या दोघींमध्ये भला-थोर फरक आहेच. तो असला तरी मला जन्म दिलेल्या मुक्ताईला मी सतत संत मुक्ताबाईंचे शहाणपण अंगिकारताना पाहिले आहे आणि मला नेहमी एकमेकींमध्ये त्यांचा लौकिकार्थाने साक्षात्कार झाला आहे. माझ्यासाठी आदर्श घेण्यासारखीच ही थोर व्यक्तित्वे आहेत.
'झोपडीचे नाही तर मनाचे दार उघड.. अपेक्षा ठेऊन अडकू नको, उद्विग्न होऊ नको..'
असे सांगणारी संत मुक्ताई
आणि समोर उभ्या ठाकलेल्या परिस्थितीसमोर हार न मानण्याची हिंमत देणारी, सदैव नवीन शिकण्याची उमेद देणारी ..
माझी मुक्ताई...
या दोघींना समर्पित.
Additional Information
Publications : मुक्ताई प्रकाशन ( Muktai Prakashan )
Author : सौ सुप्रिया राजे चिकोडी ( Supriya Raje Chikodi )
Binding : Paper Pack
ISBN No : 9789334060997
Language : मराठी ( Marathi )
Weight (gm) : 374
Width : 14
Height : 2
Length : 22
Edition : 01
Pages : 305