Description
महाराष्ट्राला इतिहास संशोधकांच्या परंपरेतील वा.सी. उर्फ वासुदेव सीताराम बेंद्रे हे एक महत्त्वाचे नाव आहे. संशोधक, लेखक म्हणून बेंद्रे यांची कारकिर्द मोठी आहे. ९० वर्षांच्या वाटचालीत त्यांनी ५७ हून अधिक इतिहास ग्रंथसंपदा निर्माण केली. आधुनिक महाराष्ट्राच्या घडणीत बेंद्रेंचा मोठा वाटा आहे. भारत इतिहास संशोधन मंडळाला संस्थात्मक स्वरूप प्राप्त करून देण्यात त्यांची कामगिरी उल्लेखनीय आहे. ऐतिहासिक कागदपत्रांचा गाढा अभ्यास असल्याने त्यांच्याकडे पेशवे दफ्तरातील ऐतिहासिक कागदपत्रांचे संकलन करण्याची जबाबदारी दिली होती. त्यांच्या या संशोधनातून प्रसिद्ध झालेली ग्रंथसंपदा गेली अनेक वर्षे दुर्मिळ झाली होती. अशा या ग्रंथमालेतील बेंद्रे यांनी लिहिलेले सहा ग्रंथ नुकतेच प्रकाशित झाले आहेत. ‘मालोजीराजे आणि शहाजी महाराज’,‘छत्रपती शिवाजी महाराज’ (पूर्वार्ध व उत्तरार्ध), ‘शिवराजाभिषेक प्रयोग’,‘छत्रपती संभाजी महाराज’ आणि 'छत्रपती राजाराम महाराज' हे सहा ते सहा ग्रंथ होय. शाहाजीने आपल्या सतरा-अठरा हजार सैन्यांतील निवडक मावळे सरदारांना त्यांचेकडून प्राणपणाने 'हिंदवी स्वराज्या'च्या हालचालींसाठी शिवाजीची पाठीराखी करण्याकरिता पाठविले. ही मदत येताच व मोगलाचा रुकार मिळताच शिवाजीने (सन १६४९) शाहाजी महाराजांच्या सुटकेनंतर राज्याक्रमणास सुरुवात केली. शहाजहान जिवंत होता तोपर्यंत त्याने शाहाजीला महाराष्ट्रात उतरण्यास प्रतिबंध केला होता; म्हणून शाहाजीनेही हिंदवी स्वराज्याचे कार्य जिजाई-शिवाजीवर सोपवून आपण सावधगिरीने आदिलशाहीत स्वतंत्रपणे वागत होता. शिवाजी मोठ्या अडचणीत आला तर शाहाजी या बंदीचीही पर्वा न करता आदिलशाहीवर आपल्या सतरा हजार स्वारांनिशी घसरला असता याची साक्ष अफजलप्रकरणी मिळालीच आहे.
Additional Information
Publications : मराठीदेशा फाऊंडेशन ( Marathidesha Foundation )
Author : वा.सी . बेंद्रे ( Va.Si.Bendre )
Binding : Hard Cover
ISBN No : 9788194998426
Language : मराठी ( Marathi )
Weight (gm) : 530
Width : 14
Height : 3
Length : 22
Edition : 3
Pages : 460