Description
पुन्हा घेतली मी भरारी वगैरे पुन्हा सज्ज झाले शिकारी वगैरे
खरा प्रश्न मी टाकलेलाच नाही तुझी मात्र चर्या विचारी वगैरे
बिचारा खरोखर भिकारी निघाला मला वाटले की पुढारी वगैरे
जगा तूच किंमत करावीस माझी तुला शोभते सावकारी वगैरे
कशाचीच आता नशा येत नाही तसा घाव होतो जिव्हारी वगैरे
तिथे एकटा तोच होता दरिद्री रुबाबात होते पुजारी वगैरे
अता फक्त होतात भेटी मनांच्या मळभ दाटलेल्या दुपारी वगैरे
किती जीवना रोज देतोस धमक्या दिली का यमाने सुपारी वगैरे ?
अतीही सुगंधी नसावीत नाती पुढे येत जाते शिसारी वगैरे
Additional Information
Publications : रसिक आंतरभारती (Rasik Antarbharti )
Author : वैभव जोशी ( Vaibhav Joshi )
Binding : Paper Pack
ISBN No : 978819099335
Language : मराठी ( Marathi )
Weight (gm) : 192
Width : 14
Height : 1
Length : 22
Edition : 07
Pages : 90