हे पुस्तक पालकांना वा इतरही कोणा वाचकांना रोचक व माहितीपूर्ण वाटेल. योग्य संशोधन करून, वैद्यकीयदृष्ट्या अचूक माहिती या पुस्तकात दिलेली आहे. अमेरिका व इंग्लंडमधील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय डॉक्टरांच्या चमूनं यावर शिक्कामोर्तब केलेलं आहे. या पुस्तकातील डॉक्टरांच्या विशेष विभागामध्ये डॉक्टरांची ओळख आणि आपल्या मुलींसाठी त्यांनी दिलेले अमूल्य सल्ले यांची नोंद केलेली आहे.
आपल्या मुलींची शरीर आधी कधी नव्हती एवढ्या वेगानं प्रौढावस्थेत येत आहेत. भावनिकदृष्ट्या तयारी होण्याच्या
कितीतरी आधीच त्या पौगंडावस्थेत आलेल्या असतात. या पार्श्वभूमीवर पाळीविषयी लाज अथवा अस्वस्थता बाळगण्याऐवजी सहजभाव यावा म्हणून आरोग्याविषयीचं संपूर्ण शिक्षण त्यांना मिळणं आवश्यक आहे. व्यंगचित्रांमधून आलेली पात्रं आणि या पुस्तकातील लक्षवेधक कथानक यांमुळं आपल्या मुलींशी पाळीविषयी बोलण पालकांसाठी खूपच सहज होऊन जाईल.
तरुण मुलींनी त्यांच्या पहिल्या पाळीसाठी पुरेस तयार असायला हवं. सर्वसाधारणपणे त्यांना पाळीविषयी भीती वाटत असते आणि त्यासंबंधी माहितीही नसते. पालक म्हणून तुम्ही मुलींना हे पुस्तक भेट देऊ शकता आणि त्यांच्यासोबत याचं वाचन करू शकता. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यात तुम्ही तुमच्या मुलीसोबत असाल आणि तिची तुम्हाला खरोखरच काळजी वाटते, हे दाखवण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे.
Publications : स्फेरुल फाऊंडेशन ( Spherule Foundation)
Author : डॉ गीता बोरा ( Doc . Geeta Bora )
Binding : Paperback
ISBN No : 9788196345808
Language : मराठी ( Marathi )
Weight (gm) : 254 gms
Dimensions : 24.3*18*0.6
Pages :84