निसुगपणाचा शेला - खर सांगायचे तर, जेंव्हा हे पुस्तक हातात घेतले वाचायला तेंव्हा जरा भीतीच वाटत होती, खरेच आपण हे पूर्ण करणार आहोत का पुस्तक? पण पुस्तक संपल्यावर मात्र १ छान आणि वेगळे पुस्तक वाचल्याचे समाधान मिळाले. हे पुस्तक कुठल्याही एका प्रकारात मोडत नाही. करंदीकर सरांचे काही अनुभव त्यांनी शब्दांकित केलेले आहेत. त्यांचा देवावर फारसा विश्वास नाही, सरांचे वाचन खूप आहे, आणि मी किती कमी वाचलंय (ना धड मराठी ना धड इंग्लिश, मी काहीच वाचलेले नाहीये) हे पहिले प्रकरण वाचून प्रकर्षाने जाणवले असो, आणि वाचना साठी काही हिंट्स देखील मिळाल्या. या पुस्तकामध्ये ३/४ कथा आहेत. कौटुंबिक नात्यांची गुंतागुंत, अपेक्षा, गैरसमज, त्यातून येणारा दुरावा, वर्षोनुवर्षे मनात ठेवलेली सल आणि या सर्व गोष्टींमुळे मनावर येणारे ताण, दुःख या विषयावर या कथा आहेत. या कथा, जेष्ठ नागरिकांच्या व्यथा आपल्यापर्यंत पोचवण्यात यशस्वी होतात. आपल्याला अंतर्मुख होऊन विचार करायला भाग पाडतात. कथा सर्वांनी आवर्जून वाचाव्यात अश्याच आहेत. कदाचित आपल्या घरातील वृद्ध लोकांचे विचार आणि त्यांचे प्रॉब्लेम्स याला आपण relate करू शकू. या पुस्तकातला “माझी मलाच पत्रे” हा प्रकार देखील इंटरेस्टिंग आहेत. मी एक पत्र येथे वाचकांसाठी जोडत आहे. शेवटचे ४ लेख देखील अतिशय वाचनीय आणि वेगळे आहेत. काव्यातील दुर्बोधता, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, संदीप खरे यांच्या एका कविता संग्रहाचा आस्वाद, मर्ढेकर आणि दुर्बोधता हे विषय लेखकाने अतिशय उत्तम पद्धतीने मांडले आहेत.
Publications : प्रफुल्लता प्रकाशन (Prafullata Prakashan) Author : प्रभाकर(बापू) करंदीकर (Prabhakar(Bapu) Karandikar) Binding : Paperback ISBN No : 9788195142736 Language : मराठी ( Marathi ) Weight (gm) : 195gms Width : 21.2 Height : 13.8 Length : 1 Edition : 1 Pages : 144
Rs. 160.00 Rs. 144.00
Shipping Extra Flat Rate - 55/- Rs Includespackaging