Description
ओमान हे पर्यटकांचं लाडकं ठिकाण समजलं जात असलं तरी भारतीयांपेक्षा युरोपियन लोकांचं स्वागत तिथे आदराने केलं जातं, यात शंका नाही; परंतु मोठ्या प्रमाणावर भारतीय लोक तिकडे काम करीत असल्याने त्यांच्या कुटुंबीयांना, नातलगांना तिथे भेट देण्याची मोठीच शक्यता असल्याने त्यांच्या- साठी हा पुस्तकप्रपंच !
अरेबियाच्या ईशान्येला म्हणजेच दक्षिण-पूर्वेला ३,०९,५०० स्के. किमी. मध्ये ओमान वसलेलं आहे. लांबच लांब समुद्रकिनारे, त्यांचं सुंदर संथ निळं पाणी, मुद्दाम तयार केलेली सुंदर लँडस्केप हे सगळंच डोळ्यांना सुखावणारं. विविध गडकिल्ले, पर्यटन स्थळं, फिरायला जाण्यासाठी डोंगरांमध्ये मुद्दाम तयार केलेल्या जागा, रस्त्यांना सुशोभित करणारी शिल्पं, डोंगरातून वर नेलेला छोटासा रस्ता, तिथेच बाजूने बांधून काढलेल्या पायऱ्या आणि वर बसायला तयार केलेल्या छोट्या-छोट्या जागा... यांनी ते नटलेलं आहे.
Additional Information
Publications : प्रफुल्लता प्रकाशन (Prafullata Prakashan)
Author : स्वाती कर्वे (Swati Karve )
Binding : Paperback
ISBN No : 9788194432494
Language : मराठी ( Marathi )
Weight (gm) : 136
Width : 14
Height : 1
Length : 21
Edition : 1
Pages : 104