Description
पाळी आणि बरेच काही...
आजूबाजूच्या वातावरणाचा, आरोग्यविषयक गैरसमजुतींचा, पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या रुढी परंपरांचा, संस्कारांचा परिणाम स्त्रीच्या विचारसरणीवर, प्रजोत्पादनासंदर्भातील निर्णयांवर आणि पर्यायाने तिच्या आरोग्यावर होतो. गेल्या काही वर्षांत स्मार्टफोनचे बोट धरून झपाट्याने बदलत गेलेल्या जीवनशैलीचा सुध्दा आरोग्यावर दूरगामी परिणाम झाला आहे.
सामाजिक संवेदना जपणाऱ्या फोंडा गोवा येथील प्रथितयश स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. रेवा दुभाषी यांनी आपल्या खास शैलीत स्त्रियांच्या आजारांची वैद्यकीय आणि सामाजिक कारणमीमांसा केली आहे.
केवळ गोळ्या औषधांनी आणि ऑपरेशन करून बरे होणारे हे आजार नव्हेत. त्यांच्या निवारणासाठी वैज्ञानिक दृष्टिकोनाची, स्त्रियांच्या आत्मशक्तीची आणि पुरुषांच्या समजूतदार पुढाकाराची गरज आहे. आपल्या आयुष्यात असलेल्या स्त्रियांचे आरोग्य समजून घेण्यासाठी कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने वाचावे आणि विचारपूर्वक अमलात आणावे असे हे पुस्तक ! या पुस्तकात जी माहिती आहे ती इंटरनेट वर नाही ..
Additional Information
Publications : श्री शारदा ग्रंथ प्रसारक संस्था फोंडा , गोवा(Shree Sharada Granth Prasarak Sanstha Fonda ,Goa )
Author :डॉ. रेवा दुभाषी (Dr Rewa Dubhashi )
Binding : Paperback
ISBN No : -------------
Language : मराठी ( Marathi )
Weight (gm) : 219+ gms
Width : 14
Height : 1
Length : 22
Edition : 1
Pages : 163