पान, पाणी नि प्रवाह - हा अनेक नोंदींचा, संदर्भांचा, घटनांचा एक संच/कोलाज आहे. एकसलग असं कथानक नाही. निवेदक वेगवेगळ्या विचारसरणींची, व्यक्तींची, प्रसंगांची, घटनांची, पुस्तकांची माहिती देत जातो. यात रत्नागिरी येते, गडचिरोली येते, व्हिएतनाम येतं, दस्तोवस्की, तुकाराम येतो, श्यामची आई, थँक यू मिस्टर ग्लाड आणि अनेक गोष्टी येतात. कादंबरीचा मोठा भाग कम्युनिझमभोवती फिरणारा आहे. कम्युनिस्ट विचार, नेते, चळवळी, नक्षलवाद या आणि अशा अनेक गोष्टी येतात. गडचिरोलीतील आदिवासी जनतेची स्थिती, परिस्थिती, वातावरण या गोष्टी येतात. कादंबरी वाचकाच्या जाणिवा विस्तारणारी आहे. वाचकाने त्याच्या धारणा तपासून पहाव्यात हे सुचवणारी आहे. यातील चिंतनाने वाचकाला एक वेगळा अनुभव देणारी आहे.
Publications : प्रफुल्लता प्रकाशन (Prafullata Prakashan) Author : अवधूत डोंगरे (Avdhut Dongre) Binding : Paperback ISBN No : 9788187549765 Language : मराठी ( Marathi ) Weight (gm) : 205gms Width : 21 Height : 13.7 Length : 0.7 Edition : 1 Pages : 208
Rs. 200.00 Rs. 180.00
Shipping Extra Flat Rate - 55/- Rs Includespackaging