Description
राजमुद्रा, की एक रहस्य ?
छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे गुप्तहेरप्रमुख बहिर्जी नाईक यांना राजमुद्रेमध्ये लपवलेले एक रहस्य, जे गेल्या ३५० वर्षांपासून उजागर होण्याची वाट पाहत आहे...
या उलगड्याचा थरारक प्रवास सांगतोय, खुद्द रायगड !
रवीला काहीच ऐकू येत नव्हते. तो प्रयत्न करत होता आवाज ऐकण्याचा, तो प्रयत्न करत होता श्वास घेण्याचा... तो डोहात पडला होता. कोणी ढकललं त्याला की तो स्वतःच पडला होता हे त्यालाही कळले नाही. तो पडला होता हेच खंर.
जिवाच्या आकांताने त्याने हातपाय हलवण्याचा प्रयत्न केला, त्याला पोहता येत नव्हतं. काही ऐकू येत नव्हते की त्या काळ्याभोर डोहात काहीच दिसत नव्हते. श्वास कोंडला होता त्याचा अंगावरचा भिजलेला अॅप्रॉन त्याला जड वाटू लागला. तेवढ्यात त्याच्या हाताला काहीतरी गुळगुळीत लागले. त्याने चाचपुन पाहण्याचा प्रयत्न केला, लांबसडक असं काहीतरी त्याच्या हातातुन निसटुन जात होतं. रवीकुमारच्या अंगावर भितीने सरसरून काटा आला. त्या पक्षांनी हे तर पाहिलं नसेल ?
Additional Information
Publications : एलोरा पब्लिकेशन( Ellora Publication )
Author : डॉ प्रकाश सुर्यकांत कोयाडे ( Dr Prakash Suryakant Koyade )
Binding : Paperback
ISBN No : 9788193446829
Language : मराठी ( Marathi )
Weight (gm) : 520 gms
Width : 14
Height : 1
Length : 22
Edition : 6
Pages : 439