'आपल्या लोककथांमध्ये एका जादूटोणा अवगत असलेल्या राक्षसाची गोष्ट येते. हा राक्षस दुष्ट, अत्याचारी असतो. आख्या जगाला त्यानं हवालदिल करून सोडलेलं असतं. हाहाकार माजविलेला असतो. त्याचा पाडाव करणं अशक्य असतं, कारण त्यानं त्याचा प्राण सातासमुद्रापलीकडं असलेल्या गुहेत एका पोपटाच्या रूपात दडवून ठेवलेला असतो. तो जादूगार तर असतोच, शिवाय तो बहुरूपीही असतो. त्याला अनेक नव्हे तर अनंत रूपं धारण करता येतात. या सर्व पेचांतून वाट काढून त्याच्याशी लढायचं तर आधी त्याचा प्राण कुठे लपवून ठेवण्यात आला आहे, हे निश्चित करणं भाग असतं. त्याचा शोध घ्यायला लागतो. आरएसएसची प्राणशक्ती कोठे आहे याच्या शोधात असताना मी अगदी प्राचीन सांस्कृतिक सांडपाण्याच्या टाक्यांमध्येही डोकावलो. कारण त्याची प्राचीन पाळंमुळं तेथूनच तर फुटून वर येत होती. मला जे दिसलं ते भयंकर किळसवाणं होतं. त्याचा कसाबसा एक तुकडा या पुस्तिकेतून तुमच्यासमोर येतोय. त्याचं संपूर्ण दर्शन मांडण्याची प्रेरणा यामुळे कुणाला झाली तर हा सर्व खटाटोप सार्थकी लागला, असे मला वाटेल. "
- देवनुरू महादेव
Publications : मधुश्री पब्लिकेशन (Madhushree Publication)
Author : देवनुरू महादेव (Devnuru Mahadev)
Binding : Paperback
ISBN No : 9789391629281
Language : मराठी ( Marathi )
Weight (gm) : 70gms
Width : 14
Height : 0.4
Length : 21.1
Edition : 1
Pages : 62