Description
सगळं उलथवून टाकलं पाहिजे’ या कवितासंग्रहात
कवी देवा झिंजाड यांनी जगण्याच्या मुशीत तावूनसुलाखून
निघालेले अनुभव शब्दबद्ध के लेले आहेत. अनेक पदरी
अनुभवांचा सुंदर गोफ म्हणजे या कविता आहेत.
या कवितांमध्
ये ओळी-ओळींतल सामाजिक भान
आपल्याला विचार करायला भाग पाडतं. कोवळ्या मनानं
गावखेड्यात सोसलेले चटके , गरिबीनं होरपळलेलं हळवं
मन विचारी झाल्यावर तुलना करू लागत
अंतरीची ओल घेऊन आलेलं साहित्यच काळाच्या
पटलावर टिकू न राहतं. डोक्यावरून ओझं न्यायचं असेल
तर रूतू नये म्हणून आपण ओझ्याखाली चुंभळ घेतो. ओझं
जरा सुसह्य करतो. तशाच प्रकारे कवितेची चुंभळ करून
वास्तवाचं ओझं पेलत कवी झिंजाड आपलं जगणं सुसह्य
करतात.
Additional Information
Publications : न्यु इरा पब्लिशिंग हाऊस (New Era Publishing House )
Author : देवा झिंजाड( Dewa Zinzad )
Binding : Paper Pack
ISBN No : 9789385565403
Language : मराठी ( Marathi )
Weight (gm) : 273
Width : 14
Height : 1
Length : 22
Edition : 02
Pages : 141