Description
आजवर जगात अनेक चरित्रे प्रसिद्ध झाली आहेत. परंतु त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे चरित्र वेगळेच म्हटले पाहिजे. ज्या मूळ हेतूने चरित्रलेखनास जगात प्रारंभ झाला, त्यावरूनदेखील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे चरित्र हे अभूतपूर्व म्हटले पाहिजे. ग्रीस देशात चरित्र-लेखनाची सुरुवात इसवी सनाच्या सहाव्या शतकाच्या सुमारास झाली. त्या देशात सुरुवातीस राजांची अगर राण्यांचीच चरित्रे लिहिली जात. या चरित्र-लेखनाचा मूळ हेतू असा सांगितला जात होता की, सत्ताधारी राजा अगर राणी यांच्या जीवनातूनच इतिहास घडत असल्यामुळे इतिहासाची नोंद ठेवण्यासाठी त्यांची चरित्रे लिहिली जाऊ लागली. मग हळूहळू जगभर चरित्रे व आत्मचरित्रे प्रसिद्ध होऊ लागली.. बी. सी. कांबळे यांनी परिश्रम करून बाबासाहेबांचे व्यक्तिमत्त्व कसे घडत गेले व ते 'तेजःपुंज' कसे बनले हे वाचकांना दाखविण्याचा प्रयत्न केला आहे तो खरोखर प्रशंसनीय आहे..
Additional Information
Publications : सुगावा प्रकाशन ( Sugava Prakashan )
Author : अॅड बी.सी कांबळे (Adv B.C. Kambale )
Binding : Paper Pack
ISBN No :
Language : मराठी ( Marathi )
Weight (gm) : 2278
Width : 14
Height : 10
Length : 22
Edition : 03
Pages :