Description
डॉ. प्रदीप नागोराव आगलावे हे नागपूर विद्यापीठातील पदव्युत्तर डॉ. बाबासाहेब विचारधारा विभागाचे प्रमुख आहेत. ते 'समाजशास्त्र आणि आंबेडकर विचारधारा' या विषयाचे एक चिकित्सक अभ्यासक आणि प्राध्यापक आहेत. फुले, आंबेडकर, बुद्ध आणि समाजशास्त्र इत्यादी विषयांवर त्यांनी विपुल लेखन केले आहे. ते लोकमतचे स्तंभ लेखक असून त्यांचे 'लोकमत' मध्ये विविध विषयांवर अनेक लेख प्रकाशित झालेले आहेत.
डॉ. आगलावे यांची 'समाजशास्त्र' या विषयावरील एकूण नऊ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. महाराष्ट्रातील विविध विद्यापीठात बी.ए. आणि एम.ए. (समाजशास्त्र) अभ्यासक्रमाकरिता त्यांच्या ग्रंथांना संदर्भग्रंथ म्हणून मान्यता मिळाली आहे. त्यांच्या ग्रंथास राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत. ते एक उत्कृष्ट वक्ते आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय समाजव्यवस्थेचे समाज शास्त्रीय दृष्टिकोनातून अध्ययन करुन समाजशास्त्रीय सिद्धान्त मांडले त्यामुळे डॉ. आंबेडकर हे समाजशास्त्रज्ञ असल्याचे डॉ. आगलावे यांनी प्रस्तुत संशोधनग्रंथातून सिद्ध केले आहे
Additional Information
Publications : सुगावा प्रकाशन ( Sugava Prakashan )
Author : डॉ प्रदीप आगलावे ( Dr Pradip Aaglave )
Binding : Paperpack
ISBN No : 9789384914653
Language : मराठी ( Marathi )
Weight (gm) : 250
Width : 22
Height : 1
Length : 14
Edition : 3
Pages : 201