आपल्या देशात एक काळ असा होता, जेव्हा आदिवासी समुदायातील लोक स्वत:ची व्यथा मांडताना म्हणायचे.. ‘आम्ही स्टेजवरही गेलो नाही आणि आम्हाला कुणी बोलावलेही नाही. बोटाच्या इशाऱ्यानेच आम्हाला आमची जागा दाखवली गेली! आम्ही तिथे बसलो. आम्हाला शाबासकी मिळाली. मग त्यांनी स्टेजवर उभे राहून आमचीच व्यथा आम्हाला सांगत राहिले!' अशा या भीषण परिस्थितीत बदल म्हणून आता द्रौपदी मुर्मू यांचं आशादायी आगमन झालं आहे. जल, जंगल आणि जमीन यांच्या संघर्षात त्या नेहमीच वंचित, उपेक्षित आणि आदिवासी समाजाच्या पाठीशी उभ्या राहिल्या आहेत.
हाताशी आलेली दोन तरणीताठी मुलं आणि पती एकापाठोपाठ हे जग सोडून गेले... नंतर भाऊ आणि आईही गेली! द्रौपदी मुर्मू यांच्या हसत्याखेळत्या आयुष्यात क्षणात होत्याचं नव्हतं झालं! या जीवघेण्या संकटांचा सामना करत, स्वतःला सावरत त्यांनी धीरोदात्तपणे परिस्थितीशी दोन हात केले आणि सुरू झाला त्यांचा विलक्षण संघर्षमय प्रवास !
Publications : दुर्वा एजन्सीज् ( Durva Agencies )
Author : विनोद श्रा. पंचभाई (Vinod Shra. Panchbhai)
Binding : Paperback
Language : मराठी ( Marathi )
Weight (gm) : 200gms
Size : 17 * 11 * 1
Edition : 1
Pages : 136