Description
श्रीवाल्मीकिरामायणाला आदिकाव्याचा दर्जा आहे. रामकथा भारतभर पसरून अनेक भाषांमध्ये रामायण लिहिले गेले आहे... वाल्मीकींची रचना साहित्य म्हणून सुंदर आहेच; पण ही नुसती रामकथा नाही. त्यात इतिहास, भूगोल, समाजव्यवस्था, त्यातील चालीरीती, राज्यव्यवस्था, राजाकडून असलेल्या अपेक्षा, मानवी संबंध अशा अनेक विषयांची विस्तृत मांडणी आहे. वाल्मीकींचा हनुमान तर आपल्या कथांमधून येणाऱ्या हनुमानापेक्षा कसा वेगळा होता तेही महत्त्वाचे आहे. राम हा विष्णूचा अवतार म्हणून जन्माला आला असला तरी रामायणात त्याचे एक कर्तबगार मानव असेच चित्रण आहे,शेकडो वर्षांपासून भारतीय जनमानसाच्या मनावर राज्य करणारी ही रामकथा संदर्भाने कथन करण्यात आलेली असून, नवीन पिढीलाही हा ग्रंथ तितकाच रोमांचक वाटेल.
Additional Information
Publications :धार्मिक प्रकाशन संस्था ( Dharmik Prakashan Sanstha )
Author : दिवाकर अनंत घैसास ( Divakar Anant Ghaisas )
Binding : Hard Cover (खंड ०१ व ०२)
ISBN No :
Language : मराठी ( Marathi )
Weight (gm) : 2300gms
Width : 14
Height : 3
Length : 22
Edition : 01
Pages :2976