शिवराज्याभिषेकाची समग्र माहिती देणारा एकमेव ग्रंथ
मध्ययुगीन भारताच्या इतिहासातील सर्वोच्च घटना म्हणजे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक. इतिहासाच्या प्रवाहाला नवे वळण देणाऱ्या या घटनेविषयी १९२०व्या शतकातील इतिहासकारांनी आजवर विविधांगी लेखन केले आहे; पण इतक्या महत्त्वाच्या विषयावर समग्र असे एकही पुस्तक नसावे, ही साहित्यविश्वातील आजवरची मोठी उणीवच होती. छत्रपती संभाजी महाराज, गागाभट्ट, कृष्णाजी अनंत सभासद, रामचंद्रपंत अमात्य, हेन्री ऑक्झिंडन यांसारख्या समकालीनांनी शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या केलेल्या वर्णनांसोबतच, या ग्रंथात आधुनिक इतिहासकार अभ्यासकांनी राज्याभिषेकासंदर्भात केलेले लेखन ज्येष्ठ विचारवंत-साहित्यिक डॉ. सदानंद मोरे यांच्या संपादकत्वाखाली एका सूत्रात गुंफण्यात आले आहे. शिवराज्याभिषेकाची सांगोपांग माहिती देत या घटनेमुळे झालेल्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक उत्क्रांतीची चर्चा करणारा मराठी साहित्यविश्वातील हा पहिलाच प्रयोग आहे.
'प्रस्तुत ग्रंथाचा मुख्य विषयच शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक असल्याने त्याचा भर राज्याभिषेक या घटनेवर व प्रक्रियेवर असणार हे उघड आहे. शिवाजी महाराजांच्या पराक्रमादि गुणांची व योगदानाची चर्चा प्रस्तुत संपादनात राज्याभिषेक हा विषय केंद्रस्थानी ठेवून करण्यात आली आहे. ही घटना केवळ राष्ट्रीयच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाची असल्याने तिचा तसाच विचार व्हायला हवा.'
डॉ. सदानंद मोरे (संपादक)
Publications : क्रिष्णा पब्लिकेशन (Krishna Publication)
Author : डॉ सदानंद मोरे (Doctor Sadanand More)
Binding : Hardbound
Language : मराठी ( Marathi )
Weight (gm) : 850gms Dimensions : 23.5 * 15.2 * 3.2
Pages : 567