Description
सिंहासनाची प्रतिष्ठा पणाला लागली होती. स्वराज्य युद्धाच्या ज्वाळांनी वेढले गेले होते. परंतु वारसा अभेद्य होता.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अकाली मृत्यूनंतर मराठा साम्राज्यात अराजकता माजली. महाराजांच्या निर्भय, शूर लढवय्या पुत्राला आपल्या स्वतःच्या दरबारातील फंदफितुरीवर मात करावीच लागली आणि त्याशिवाय औरंगजेबाच्या विशाल मुघल सैन्याच्या फौजांशीही मुकाबला करावा लागला.
मुघल सल्तनतीच्या फौजा जवळ येत होत्या, ब्रिटिश आणि पोर्तुगीज नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी दबा धरून बसले होते. किनारपट्टीवर सिद्दीची जोखीम होती आणि आदिलशाहीच्या उरल्यासुरल्या सत्तेशी अद्यापही संघर्ष करावा लागत होता. छत्रपती संभाजी महाराज फक्त एकच नव्हे, तर एकाच वेळी पाच-पाच बलाढ्य शत्रूशी लढा देत होते.
कट-कारस्थानांना ऊत आलेला असताना आणि तलवारींचा खणखणाट सुरू असताना स्वराज्याचे भवितव्य पणाला लागले होते. छत्रपती संभाजी महाराजांनी मान तुकवणे किंवा मोडून पडणेही नाकारून जमिनीवर आणि समुद्रातही अटीतटीची युद्धे केली. प्रत्येक युद्ध, प्रत्येक बलिदान हे त्यांच्या पित्याने म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वप्न पाहिलेल्या स्वराज्यासाठीच केले जात होते.
परंतु इतिहासाच्या भरतीच्या लाटांच्या विरोधात एकटे पडलेले छत्रपती संभाजी महाराज स्वराज्याला अखंड ठेवू शकणार होता का ? की, त्यांच्या जाज्वल्य तेजामुळे, देदिप्यमान चैतन्यामुळे कधीही न विझणारी क्रांतीज्योत पेटणार होती ?
शिवरायांचा छावा म्हणूनच मोठ्या प्रमाणात छत्रपती संभाजी महाराजांना ओळखले जाते. त्यांचे जीवन हे धाडस, शौर्य, त्याग, बलिदान आणि स्वातंत्र्यासाठीचा अमर लढा यांची शौर्यगाथा आहे.
Additional Information
Publications : (Madhushree Publication)
Author : आदित्य निघोट ( Aditya Nighot )
Binding : Paperback
ISBN No : 9788198291554
Language : मराठी ( Marathi )
Weight (gm) : 298 gms
Width : 14
Height : 2.5
Length : 22
Edition : 1
Pages : 304