Description
अक्कलकोटनिवासी श्रीस्वामीसमर्थ महाराजांची 'रंग'चित्रे आजवर अनेक चित्रकारांच्या कुंचल्यातून समर्थपणे साकारलेली आहेत. रंगसम्राट रघुवीर मुळगावकर, गोपाळराव देऊसकर, नेपथ्यकार पु. श्री. काळे यांसारख्या दिग्गजांपासून, समर्थभक्त स. कृ. काळे, अरुण फडणीस यांसारख्या 'मनस्वी' चित्रकारांपर्यंत अनेकांनी चितारलेली आणि लोकप्रियतेचा उच्चांक गाठलेली अनेक 'स्वामीचित्रे' श्रीस्वामीभक्तांच्या हृदयसिंहासनावर आजही विराजमान आहेत. असे असतानाही, गेल्या दोन दशकांपासून आगळ्यावेगळ्या चित्रशैलीसह आकर्षक रंगछटांचा वापर करीत साकारलेली 'स्वामीचित्रे' आणि त्यासोबत, 'शेखर साने' नावाची ठसठशीत 'नाममुद्रा' सर्वत्र सर्वदूर लोकप्रिय झाली आहे.
आज, हजारो सश्रद्ध स्वामीभक्तांच्या घरात, देवघरात, मोबाईलचा स्क्रीन आणि लॅपटॉपच्या वॉलपेपरवर हटकून आढळणारी, अनेकविध मंदिरे, उपासना केंद्रे, कॅलेण्डर आणि पुस्तकांची मुखपृष्ठे या सोबतच सर्व लोकप्रिय आणि बहुचर्चित समाजमाध्यमांवर शेखर साने यांच्या कुंचल्यातून चितारलेली 'स्वामीचित्रे' पाहावयास मिळतात. श्रीस्वामीसमर्थांची देहबोली आणि भावमुद्रा प्रकट करणाऱ्या हजारो चित्रांमधून निवडक वैविध्यपूर्ण 'स्वामीचित्रे' एकत्रित स्वरूपात प्रसिद्ध करण्याचा योग साधलेला आहे....
Additional Information
Publications : रसिक आंतरभारती (Rasik Antarbharti )
Author : शेखर साने ( Shekhar Sane )
Binding : Hardcover
ISBN No : 9788194787563
Language : मराठी ( Marathi )
Weight (gm) : 2250
Width : 28
Height : 4
Length :30
Edition : 01
Pages : 255