चतुश्लोकी
स्कंध २, ९ वा अध्याय
सृष्टीच्या अगोदर केवळ मीच होतो, माझ्याव्यतिरिक्त स्थूल, सूक्ष्म किंवा या दोन्हींचे कारण अज्ञान तेही नव्हते. या सृष्टीच्या उत्पत्तीनंतर जे काही प्रतीत होत आहे, तेही मीच आहे. तसेच (प्रलयानंतर) जे काही शिल्लक राहील, तेही मीच असेन (श्लोक ३२)
ज्याप्रमाणे चंद्र एक असूनही दृष्टिदोषाने दोन चंद्रांचा भास होतो, त्याप्रमाणे दुसरी कोणतीही वस्तू नसूनही परमात्म्याच्या ठिकाणी तिचा भास होतो किंवा ज्याप्रमाणे नक्षत्रांत राहू असून तो दिसत नाही, त्याप्रमाणे आत्मा असून त्याची प्रचिती येत नाही, ती माझी माया समज. (श्लोक ३३)
प्राण्यांच्या पंचमहाभूतरचित लहानमोठ्या शरीरांत आकाशादी पंचमहाभूते, ती शरीरे त्यांचे कार्य असल्याने त्यांच्यात प्रवेश करतात (असे वाटते, पण) सुरूवातीपासूनच त्या ठिकाणी कारणरूपाने ती असल्याकारणाने प्रवेश करीतही नाहीत. हे जसे, तसेच त्या प्राण्यांच्या शरीराच्या दृष्टीने मी त्यांच्याकडे आत्म्याच्या रूपाने प्रवेश केला आहे. (असे वाटते). पण आत्मदृष्टीने पाहाता माझ्याव्यतिरिक्त दुसरी कोणतीच वस्तू नसल्याने त्यांच्यामध्ये माझा प्रवेश झालेलाही नाही. (श्लोक ३४)
जे सर्व ठिकाणी सदोदित असते, तेच आत्मतत्त्व होय. हेच तत्त्वजिज्ञासू माणसाने अन्वयव्यतिरेकाने जाणावे. (श्लोक ३५)
Publication : मल्टिव्हर्सिटी प्रकाशन (Multiversity Publication)
Author : बाळासाहेब बडवे (Balasaheb Badve)
Language : मराठी ( Marathi )
Weight : 502gms
Binding : Paperback
Pages : 429
Edition : 1
Width : 21.8
Height : 14.2
Length : 2