Description
शुद्र लोक हे आर्य होते किंवा हिंदुस्थानचे मूळचे रानटी रहिवासी होते किंवा जमातींच्या संमिश्रणाने तयार झालेल्या टोळ्यांतील लोक होते हा प्रश्न वास्तविक सध्या फारसा महत्त्वाचा नाही, अगदी प्राचीन काळात शुद्र लोकांचा एक स्वतंत्र वर्ग निर्माण करण्यात आला आणि त्यांना समाजात चवथे किंवा शेवटचे स्थान देण्यात आले. वरच्या तीन वरिष्ठ जातींची जी स्थानं होती त्यांच्यात आणि शुद्रांच्या स्थानात पुष्कळसे अंतर ठेवण्यात आले होते. शुद्र लोक प्रथमतः आर्य नव्हते पण जरी मान्य केली तरी आपीच्या तीन जातीमध्ये त्यांचे संमिश्र विवाह इतक्या मोठ्या प्रमाणावर झाले की मूळच्या शुद्र लोकांचे रुपांतर तर 'आर्य लोक' असे आतापर्यंत होत आलेले आहे. या असल्या रुपांतरामुळे शुद्रांचा काही बाबतीत तोट्यापेक्षा फायदाच जास्त झालेला आहे, हे पूर्वी दाखविण्यात आलेले आहे आणि ज्या काही टोळ्यांना सध्या शुद्र म्हणून संबोधण्यात येते त्यांच्यात वास्तविकपणे ब्राह्मण व क्षत्रिय लोकांचे गुणावगुण जास्त ठळकपणे दृग्गोचर होतात, ब्राह्मण व क्षत्रिय लोकांच्या गुणावगुणांपेक्षा इतर लोकांचे गुणावगुण त्या टोळ्यांमध्ये अगदी कमी प्रमाणात पहावयास मिळतात. सारांश, इंग्लंडमधील सेल्टिक टोळ्या अँग्लो-सॅक्सन वंशात जशा मिसळून गेल्या त्याचप्रमाणे शूद्रांच्या टोळ्या इतर वंशांमध्ये मिसळून गेल्या आहेत. इतर वंशांमध्ये शूद्र टोळ्यांचे संमिश्रण
इतके झालेले आहे की, त्यांना जे पूवी स्वतंत्र अस्तित्व होते ते अजिबात नष्ट झालेले आहे.
--------डॉ. बाबासाहेब आंबेडकर.
Additional Information
Publications : सुगावा प्रकाशन ( Sugava Prakashan )
Author : डॉ बाबासाहेब आंबेडकर ( Dr Babasaheb Ambedkar )
Binding : Hard Cover
ISBN No : 9789380166135
Language : मराठी ( Marathi )
Weight (gm) : 305
Width : 14
Height : 1.5
Length : 22
Edition : 01
Pages : 236