Description
धर्मग्रंथातील स्त्रीचे दुय्यम स्थान, शासनाच्या कल्याणकारी धोरणामुळे स्त्री चळवळीचे थंडावलेपण, स्त्री-पुरुष समानतेचे ध्येय अद्यापी अपूर्ण अशा महत्त्वाच्या निष्कर्षाप्रत डॉ. वर्षा वाघमारे आलेल्या आहेत. पाश्चिमात्य व पौर्वात्य विद्वानांचे संदर्भ, ग्रंथांचे दाखले तसेच अनेक स्त्रीवादी कार्यकर्त्यांच्या मुलाखती यामुळे अभ्यास विषय सखोलपणे वर्षाताईंनी अभ्यासल्याचे दिसते. स्त्री प्रश्नावर जागतिक परिप्रेक्षात इतका समृद्ध ग्रंथ मी प्रथमच अनुभवतो आहे. हजारो संदर्भ आणि धर्म-तत्त्वज्ञान- इतिहास-साहित्य-कलांची अभ्यासपूर्ण मांडणी वर्षाताईंनी या ग्रंथात करून स्त्रीप्रश्नाला समर्थ न्याय दिलाय. धर्म, इतिहास, संस्कृती, कायदा, तत्त्वज्ञान, साहित्य यांचा लेखिका डॉ. वर्षा वाघमारे यांचा अभ्यास सम्यक स्वरूपाचा असून स्त्री प्रश्नासंबंधीची त्यांची भूमिका व्यापक आकलनाची आहे. विशेष म्हणजे समग्रता व प्रगल्भता हे लेखन विशेष या लेखनात आहेत. शिवाय निर्दोष चिंतन, बुद्धिप्रामाण्यवादी मांडणी आणि स्त्रीवादाचा वस्तुनिष्ठ कैवार यामुळे डॉ. वर्षा वाघमारे यांचा ग्रंथ अभिजात आणि अव्वल झालाय.
Additional Information
Publications : सुगावा प्रकाशन ( Sugava Prakashan )
Author : डॉ वर्षा वाघमारे ( Dr Varsha Waghmare )
Binding : Paperpack
ISBN No : 9788195877898
Language : मराठी ( Marathi )
Weight (gm) : 384
Width : 22
Height : 2
Length : 14
Edition : 01
Pages : 336