ते आभाळ भीष्माचं होते ( Te Abhal Bhishmache Hote )

Rs. 1,000.00

Out of stock
Availability : In StockIn StockOut of stock

Description

मी अश्वत्थामा. चिरंजीव.!" या रसिकाग्रणी गाजलेल्या महा-कादंबरी नंतर अल्पावधीतच 'ते आभाळ भीष्माचंच होतं..!' ही पितामह भीष्माचार्य यांच्या कर्मसिद्धीवर एक नितांत सुंदर अभिलिखित महा-कादंबरी मराठी रसिक वाचकांच्या 'अमृताचिए ताटी' आस्वादासाठी माझे परम मित्र नाटककार, दिग्दर्शक, अभिनेते, कादंबरीकार अशोक समेळ यांनी 'ओगरली' आहे.

पितामह भीष्माचार्याच्या चरित्राचा आणि चारित्र्याचा इतका विस्तृत, मूलगामी आणि मर्मग्राही धांडोळा मराठी वाङ्मयात प्रथमच यथासांग चित्रित करण्याचे महत्कार्य 'ते आभाळ भीष्माचंच होतं..!' या महा-कादंबरीच्या मिषाने अशोक समेळ यांनी व्रतस्थपणे केले आहे. भीष्म हे स्वतः एक तारांकित असे आभाळ होते..! ताऱ्यांनी खच्चून भरलेले निगम अंतराळ होते..! नि त्या अंतस्थ अंतराळात ध्रुव ताऱ्यासारखा अढळ कर्मयोगी, निःसंग पुरुषार्थी व निरामय आर्ती असलेला पितामह भीष्माचार्यांचा कधीही निस्तेज न होणारा तेजःपुंज दीपस्तंभ आहे..!

महाभारताच्या परिघाचा हा घनमध्य मानबिंदू म्हणजे ताण-तणावांनी भारलेला

'देवव्रत'; महापराक्रमी, दार्शनिक तत्त्वज्ञानी, महारथी कोदंडधारी परश्राम शिष्य.. पितामह भीष्माचार्य..! की ज्यांच्या नावावरून 'भीष्म प्रतिज्ञा' ही शब्दसिद्धी चिरकालासाठी अखिल संस्कृतीत दृढमूल झाली आहे. भारतीय संस्कृतीचा झगमगता इतिहास भीष्माचार्यांना टाळून पुढे जाऊच शकत नाही, हे केवळ एकमेवद्वितीय सत्य आहे..!! या सर्व महाकालपटाचा वेध आणि निर्वेध घेताना श्री. अशोक समेळ यांनी आपली तपश्चर्या फळाला लावली यात शंकाच नाही..! व्यामिश्र कथेतून भीष्माचार्यांचा दीपस्तंभ उजळत ठेवताना त्यांनी जे भाषिक पालाण घातले आहे त्याला तोड नाही.

अशोक समेळ यांनी नाट्यात्मक संवाद, कथानकाचा कालपट, सघनसार्थ भाषा व भीष्माचे तरलतम अंतरंग या चार दिग्गजांवर पेललेले हे भीष्मांचे आभाळ आहे..! शेवटी रंगातून अंतरंगाकडे जाणे हे नाटक आणि अंतरंगाचे आत्मिक विविध रंगदर्शन करते ती महा-कादंबरी..! 'ते आभाळ भीष्माचंच होतं..!' या महा-कादंबरीचे रसिकांच्या मनोपंजरी स्थित असण्याचे चिरंजीवित्व हेच भागधेय आहे..!!

या दृष्टीने अशोक समेळ यांची ही महा-कादंबरी अभिजात वाङ्मयात धृवस्थित होईल अशी मला मनोमन खात्री आहे..!

Additional Information 

Publications : डिंपल पब्लिकेशन (Dimple Publication)
Author : अशोक समेळ(Ashok Samel ) 
Binding : Paper Pack 
ISBN No : 9789392419881
Language : मराठी ( Marathi )
Weight (gm) : 1150
Width : 14
Height : 2.5
Length : 22
Edition : 03
Pages : 802

Sunday,Monday,Tuesday,Wednesday,Thursday,Friday,Saturday
January,February,March,April,May,June,July,August,September,October,November,December
Not enough items available. Only [max] left.
Add to WishlistBrowse WishlistRemove Wishlist
Shopping cart

Your cart is empty.

Return To Shop

Add Order Note Edit Order Note
Add A Coupon

Add A Coupon

Coupon code will work on checkout page

ते आभाळ भीष्माचं होते ( Te Abhal Bhishmache Hote )

Rs. 1,000.00