Description
प्रिन्स चार्ल्स यांच्या हस्ते २०१३ मध्ये 'द यंग आंत्रप्रेन्युअर' हा जागतिक दर्जाचा पुरस्कार मिळाल्यानंतर शरद तांदळे महाराष्ट्रातील नवउद्योजकांच्या गळ्यातील ताईत झाले.
खरंतर त्यांची सुरुवात शून्यातून झाली होती, हे मोजक्या मंडळींनाच माहीत होतं. त्यातल्याच काहींनी आजवरचा प्रवास पुस्तकरूपात मांडण्याचा आग्रह केला.
आपला प्रवास जर इतरांसाठी प्रेरणादायी ठरू शकणार असेल तर आपण तो नक्कीच मांडला पाहिजे असा विचार करून साकार झाले, शरद तांदळे यांचे 'द आंत्रप्रेन्युअर' हे पुस्तक ! मराठी तरुणांना कुठलेही पोकळ स्वप्न न दाखवता उद्योगविश्वाची ओळख करून देण्यात शरद तांदळे यशस्वी झाले आहेत.
स्वप्नांना वास्तवाशी जोडून, स्वतःच्या क्षमता आणि मर्यादा ओळखून स्वतःला घडवणं म्हणजेच यशस्वी आयुष्याचे गमक शरद तांदळे यांनी तरुणांना या पुस्तकामार्फत दिले आहे.
Additional Information
Publications : न्यु इरा पब्लिशिंग हाऊस (New Era Publishing House )
Author : शरद तांदळे( Sharad Tandale )
Binding : Paper Pack
ISBN No : 9788193446674
Language : मराठी ( Marathi )
Weight (gm) : 276
Width : 14
Height : 2
Length : 22
Edition : 02
Pages : 184