'त्रिकोणातील बिंदू' ही आधुनिक स्त्रीच्या आत्मसन्मानाची व आत्मभानाची कथा आहे. पुरुषप्रधान समाजव्यवस्थेत स्त्रीचं मन विचारात घेतलं जात नाही. ती कितीही शिकली तरी तिला निर्णय घेण्याचा अधिकार नाही हे आपल्या समाजाचं वास्तव आहे. त्यामुळे या कथेतील 'सारंगी' काहीशी विद्रोही भूमिका घेते. भावना व कर्तव्य यात ती भावनेला महत्त्व देते. लादलेल्या संसाराला व पाच वर्षांच्या यशला सोडून ती प्रियकराकडे निघून जाते. पण येथेच ती समाजाच्या दृष्टीने गुन्हेगार ठरते. यात पत्नीच्या मनाचा विचार न करणारा आदित्य हा मात्र नामानिराळा राहतो. खरं तर सारंगी नव्हे तर इथली जातिनिष्ठ व कर्मठ समाजव्यवस्था खरी गुन्हेगार आहे.. त्यामुळे सारंगीच्या विद्रोहाचं स्वागत परंपरागत मानसिकतेतून शक्य नाही. नायिका स्त्री स्वातंत्र्याचा पुरस्कार करते, तशीच ती मानवतेचाही पुरस्कार करते. आई-वडील आणि समाज या त्रिकोणात यश हा भरडला जातो. यश हा कथेचा केवळ बिंदू नसून केंद्रबिंदू आहे. यशचं भविष्य या तिघांच्या हातात आहे. पण त्यासाठी इथल्या समाजव्यवस्थेला आधी बदलावं लागेल असा स्पष्ट संदेश ही कथा देते'. - डॉ. आनंदा गांगुर्डे
Publications : प्रफुल्लता प्रकाशन (Prafullata Prakashan) Author : राजेंद्र खैरनार (Rajendra Kahirnar) Binding : मराठी ( Marathi ) ISBN No : 9788194432456 Language : Marathi Weight (gm) : 250gms Width : 21.5 Height : 14 Length : 1 Edition : 1 Pages : 219
Rs. 250.00 Rs. 225.00
Shipping Extra Flat Rate - 55/- Rs Includespackaging