Description
गेल्या वीस वर्षांहून अधिक काळ व्यावसायिक जगामध्ये धडपड केल्यानंतर, यशापयशाचे अनेक अनुभव माझ्याकडे जमा झाले. त्यातून समजले की, यश मिळविण्याचा किंवा अपयश पदरी पडण्याचा असा कोणताही नियम नाही. त्यामुळे, अपयशाने निराश न होता आणि यशाने हुरळून न जाता आपले काम आणि प्रयत्न करत राहणे, हाच नियम मी माझ्या मनाशी पक्का केला आहे. रोजगार हमी योजनेवरील मजुरापासून छोटेखानी व्यावसायिक होण्यापर्यंतचा माझा हा प्रवास आहे. अजूनही खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे. या अनुभवांसह वयाची चाळिशी गाठल्यानंतर आता कुठे व्यावहारिक जीवनाची अक्कल दाढ उगवायला सुरुवात झाली आहे, असेच वाटते. असे सुमारे दोन तपांचे 'उद्योगी' व 'निरुद्योगी' अनुभव आणि त्यातून सुचलेले विचार शेअर करण्याचा हा प्रयत्न 'उद्योगीनामा' मध्ये केला आहे.
Additional Information
Publications : कृषीरंग पब्लिशिंग हाउस ( Krushirang Publishing House )
Author : सचिन मोहन चोभे ( Sachin Mohan Chobhe )
Binding : Paperback
ISBN No : 9788197067891
Language : मराठी ( Marathi )
Weight (gm) : 183 gms
Width : 14
Height : 1
Length : 22
Edition : 1
Pages : 180