महाभारताचे व्यासंगी अभ्यासक आणि १९०८ मध्ये झालेल्या ग्रंथकार संमेलनाचे अध्यक्ष चिंतामण विनायक वैद्य यांनी एकटय़ाने अवघ्या चार वर्षांत हा उपसंहार सिद्ध केला होता. महाभारत या ग्रंथाला आपल्या समाजजीवनात महत्त्वाचे स्थान आहे. १९०४ ते १९१२ या कालखंडात ग. वि. चिपळूणकर आणि मंडळीने त्या काळी उपलब्ध असलेल्या तीन-चार प्रतींपकी गोपाळ नारायण यांची प्रत घेऊन ‘श्रीमन्महाभारताचे मराठी सुरस भाषांतर’ हा प्रकल्प एकूण नऊ खंडांत प्रसिद्ध केला होता.ज्येष्ठ कादंबरीकार ह. ना. आपटे यांनी त्याचा उपोद्घात लिहिला होता. या प्रकल्पाचा उपसंहारही आपटे लिहिणार होते. पण काही कारणांनी त्यांना ते शक्य झाले नाही. लोकमान्य टिळक यांनी महाभारताचे गाढे अभ्यासक-संशोधक चिंतामण विनायक वैद्य यांच्याकडून हा उपसंहार लिहून घेण्यात यावा, असे प्रकाशकांना सुचविले होते. त्यानुसार वैद्य यांनी प्रकाशकांनी केलेली विनंती मान्य केली. अवघ्या चार वर्षांच्या अथक परिश्रमातून संशोधन, संकलन आणि संपादनाचा व्याप सांभाळून वैद्य यांनी एकहाती हा ग्रंथ सिद्ध केला. श्रीमन्महाभारताचे मराठी सुरस भाषांतर या ग्रंथाचा उपसंहार हा महाग्रंथ शंभर वर्षांपूर्वी साकारणे ही महत्प्रयासाची गोष्ट होती.
काय वाचायला मिळेल या ग्रंथात?
१) महाभारत आणि भारती युद्ध हे एकच की वेगवेगळे?
२) महाभारताचा कालखंड नेमका कोणता?
३) महाभारत हे काल्पनिक आहे की सत्य?
४) महाभारत कालिन शासनव्यवस्था, अर्थव्यवस्था, शिक्षणव्यवस्था, सामाजिक परिस्थिती, वर्णव्यवस्था, विवाहसंस्था, राजकीय परिस्थिती, सैन्य व युद्ध, व्यवहार व उद्योगधंदे, ज्योतिष आश्रमव्यवस्था.
५) महाभारतकालीन धर्म, तत्वज्ञान, वाड्मय व शास्त्रे, भौगोलिक माहिती, महाभारतावरील भिन्न मतांचा विचार, श्रीमद्भगवतगीतेवर छोटं भाष्य.
Shipping Extra Flat Rate - 55/- Rs Includes packaging