Description
हा एका, जगालाही पूज्यविषय झालेल्या, आदर्श पुरुषाचा जीवनप्रवास सांगणारा ग्रंथ आहे. लोकाभिमुख राजा कसा निस्पृह आणि लोककल्याणकारी असावा याचा आदर्श म्हणजे श्रीरामचंद्र सर्वदृष्ट्या संपन्न राज्याच्या प्रस्थापनेसाठी, शाश्वत अशा जीवन मूल्यांच्या जोपासनेसाठी, प्रस्थापनेसाठी अत्यंत पराकोटीचे दुःखमय जीवन, करुणानिधी लोकाभिमुख राजाने कसे जगावे, याचा श्रीरामचरित हा आदर्श आहे. म्हणूनच श्रीराम हा जीवनादर्श आहे. केवळ भारतीयांचाच नव्हे, तर साऱ्या जगाचाही. आणि म्हणूनच ईजिप्तसारखी पाश्चिमात्य आणि फिलिपाईन्ससारखी पौर्वात्य राष्ट्र रामायण आमचेच, असे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या म्हणतात. ईजिप्तचे राजे 'रॅमसिस' अभिधान धारण करणारे, तर फिलिपाईन्सचे राजे 'राम दि फर्स्ट', 'राम दि सेकंड' अशासारखी बिरुदावली स्वीकारणारे आहेत. म्हणून रामायण हा महाकाव्यरूप इतिहास किती उदात्त आणि जगन्मार्गदर्शक आहे, हे मेकॉलेच्या पुढील एका विधानावरून फार प्रकषनि मनावर ठसते; 'आदर्शवत् पूर्णत्वाला गेलेला इतिहास म्हणजे काव्य आणि तत्त्वज्ञान यांचा सुंदर समन्वय आहे. वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिचित्रे आणि घटना यांच्या रूपाने त्रिकालाबाधित सत्यच, असा पूर्णत्व पावलेला इतिहास वाचकाच्या मनावर बिंबवतो.' स्वामी विवेकानंद तर म्हणतात, 'रामायण हा मानवतेला अजूनही ईप्सित म्हणून असलेल्या प्राचीन उदात्त आर्यसंस्कृतीचा विश्वकोशच आहे.'
Additional Information
Publications : वरदा प्रकाशन ( Varada Prakashan )
Author : भालबा केळकर ( Bhalba Kelkar )
Binding : Hard Cover (खंड ०१ , ०२ व ०३)
ISBN No :
Language : मराठी ( Marathi )
Weight (gm) : 2000gms
Width : 14
Height : 6
Length : 22
Edition : 01
Pages :1192