योगवासिष्ठ हा भारतीय तत्त्वज्ञान प्रणालीतील एक अत्यंत महत्त्वाचा व अनन्यसाधारण ग्रंथ म्हणून प्रसिद्ध आहे. मूळ संस्कृत ग्रंथ फार विस्तृत असून त्यात ३२००० श्लोकांचा समावेश आहे. वेदशास्त्रसंपन्न कै. रघुनाथशास्त्री पावगी यांनी या गहन ग्रंथाचे सार काढून तो अत्यंत सुबोधपणे मराठी भाषेत प्रस्तुत केला आहे. हा ग्रंथ एकदा वाचायला घेतला की त्याची गोडी इतकी लागते. की वेदान्तावर इतका सुंदर व मार्मिक ग्रंथ विरळाच असेल असे लक्षात येते. माझा तरी हाच अनुभव आहे. खरोखर योगवासिष्ठ हा अत्युच्च कोटीचा ज्ञान-विज्ञान ग्रंथ असून या ग्रंथात मानसशास्त्रावर झालेला विचार भारतीय किंवा विचार वैश्विक प्रणालीत अन्य कोणत्याही ग्रंथात पाहायला मिळत नाही.
महर्षी वसिष्ठांच्याच शब्दांत सांगायचे झाले तर
यदिहास्ति तदन्यत्र व तत्क्वचित् ।
इमं समस्तविज्ञानशास्त्रकोषं विदुर्बुधाः ।। ३-८-१२
जे या ग्रंथात आहे, तेच इतर ग्रंथांतून आहे, आणि जे यात नाही ते कोठेही नाही. कारण हा ग्रंथ म्हणजे सर्व भारतीय मानसशास्त्राच्या ज्ञानाचे धनाचे भांडार आहे, असे जे ज्ञानी पुरुषांनी वर्णन केले आहे ते अक्षरशः खरे आहे.
-डॉ. विजय भटकर
Shipping Extra Flat Rate - 55/- Rs Includes packaging