Description
हे महाराष्ट्रातील विचारवंतांतील एक अग्रगण्य नाव. संगमनेर महाविद्यालयात राज्यशास्त्र या विषयाचे अध्यापन करीत असताना त्यांनी लिहीलेली ग्रंथसंपदा डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय राज्यघटना (१९७७), झोत (१९७८), दलित चळवळीची वाटचाल (१९८२), आंबेडकर आणि मार्क्स (१९८५), आंबेडकरवाद-तत्त्व आणि व्यवहार (१९८९), हिंदू-मुस्लिम प्रश्न आणि सावरकरांचा हिंदुराष्ट्रवाद (१९९४), मानव आणि धर्मचिंतन (१९९६) यापैकी काही ग्रंथांची कन्नड आणि तेलगू भाषेत भाषांतरे झाली. आंबेडकर आणि मार्क्स या ग्रंथाला प्रियदर्शनी, साहित्य परिषद, पुणे आणि महाराष्ट्र शासनाची पारितोषिके मिळालेली आहेत.
त्यांच्या आजवरच्या वैचारिक लेखनाने आणि १९८७ साली सोलापूर येथे झालेल्या अ. भा. दलित साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणाने समाजपरिवर्तनाच्या चळवळीतील कार्यकर्त्यांना, साहित्यिकांना आणि विचारी वाचकांना व्यापक पायावर उभ्या असलेल्या पुरोगामी विचारांची तर्कशुद्ध आणि स्पष्ट दिशा प्राप्त झाली.
Additional Information
Publications : सुगावा प्रकाशन ( Sugava Prakashan )
Author : डॉ रावसाहेब कसबे ( Dr Raosaheb Kasabe )
Binding : Paperpack
ISBN No : ---
Language : मराठी ( Marathi )
Weight (gm) : 124
Width : 22
Height : 1
Length : 14
Edition : 09
Pages : 132