Description
“स्वत-ला फालतू समजण्याची गोष्ट’ या पुस्तकाला राज्य सरकारचा पुरस्कार मिळवणाऱ्या अवधूत डोंगरे या तरुण लेखकाचं हे दुसरं पुस्तक. यामध्ये त्यानं वेगळा फॉर्म वापरला आहे. ही छोटीशी कादंबरी; पण त्यामध्ये पहिल्या दोन भागांत दोन कथांमधून काही व्यक्तिरेखा समोर येतात. तिसरा भाग हा चिंतनात्मक आहे. या तिन्ही भागांत एक सूत्र आहे. लेखनप्रकियेचा शोध त्यात आहे. आजच्या तरुणाईची भाषा आणि अनुभवाच्या ताकदवान मांडणीतलं वेगळेपण यामुळं वाचक यातील कथानकात गुंतून जातो. लेखकाला काय सांगायचं आहे, याचा विचार करत काही वेळा संभ्रमातही पडतो. कथानकातील विविध पात्रांच्या माध्यमातून लेखक जीवनविषयक अनेक प्रश्न उभे करतो.
Additional Info
Publications : प्रफुल्लता प्रकाशन (Prafullata Prakashan)
Author : अवधूत डोंगरे (Avdhut Dongre)
Binding : Paperback
ISBN No : 9788187549666
Language : मराठी ( Marathi )
Weight (gm) : 120gms
Width : 21
Height : 14
Length : 0.5
Edition : 1
Pages : 95