Description
यात जगाचे तडाखे बसूनही अबाधित राहिलेली निरागसता आहे... एक रसरशीत आणि जिवंत पुस्तक... निखिलेश चित्रे
'या पुस्तकातील घटना, पात्रं पकड घेतात. या विश्वात रमायला होतं.... हृषीकेश गुप्ते
प्रत्येकाच्या सफरनाम्यातली एक फेज... अशी अडनिडी... धड न लहान राहिल्याची नी धड न मोठं झाल्याची! काय नाही अनुभवत या गोंधळाच्या, तगमगीच्या, हरवलेपणाच्या आणि गवसलेपणाच्याही काळात ?
पहिला बेस्ट फ्रेन्ड... शाळेत घडलेलं एखादं डेजर कांड... क्रिकेटच्या ग्राऊंडवरचं पडीक राहाणं.. लायब्ररीतल्या पुस्तकांचा तो गंध... आज्जी-आजोबांचा लोण्यासारखा मायेचा मऊ स्पर्श... शेजारच्या दादाचं गच्चीवरचं अफेअर... आणि अनुभवलेला पहिला-वहिला ब्रेकअप...
असे काही चमकते तर काही काळ्या करड्या शेडचे तुकडे प्रत्येकाच्याच आयुष्यात असतात. अशा काही तुकड्यांचाच हा ओढाळवाणा सफ़रनामा !
के फॉर कुमार... के फॉर कल्याण.... के कनेक्शन्स
Additional Information
Publications : रोहन प्रकाशन ( Rohan Prakashan )
Author : Pranav Sakhdeo लेखक : प्रणव सखदेव
Binding : Paperback
ISBN No : 9789348521170
Language : मराठी ( Marathi )
Weight (gm) : 250
Width : 14
Height : 2
Length : 22
Edition : 1
Pages : 194