Description
माझ्या बापाने तोंड उघडलं काही क्षण गेले असतील नसतील. मग पहिल्यांदा त्या पत्रकाराला माझं -या निळ्याभोर दंतराजाचं दर्शन झालं. माझा बाप विचारलेल्या प्रश्नांचं उत्तर देत होता. पण पत्रकारांचं सगळं लक्ष केंद्रित झालं होतं, ते माझ्यावर - शहाणपणाच्या निळ्याभोर दंतराजावर ! माझा बाप बोलणं थांबत म्हणाला, काय झालं? पत्रकार म्हणाला, "तुम्हाला एक दात आहे, निळाभोर!"
बापाच्या मनात तो आवाज घुमला 'दंतरुपी शहाणपणा!' तो उठणार, तोच धपकन खाली पडला आणि मेला! आणि माझी रवानगी झाली त्या पत्रकाराच्या हिरडीत !
मानवाची फरफट आता सुरु होणार होती. कारण माझी हि कहाणी कुणालाच ठाऊक नव्हती. खरंतर शहाणपणाचाच शाप झाला होता!
Additional Information
Publications : रोहन प्रकाशन ( Rohan Prakashan )
Author : Pranav Sakhdeo लेखक : प्रणव सखदेव
Binding : Paperback
ISBN No : 9789386493545
Language : मराठी ( Marathi )
Weight (gm) : 210
Width : 14
Height : 2
Length : 22
Edition : 1
Pages : 205