Description
उदास पोकळी... की पोकळीतच उदासी राहते भरून? समीरच्या आयुष्यात ही पोकळी आहे. का आहे ही पोकळी?
का वागतोय तो असा? 'इन्फेक्टेड पेनड्राइव्हमधल्या व्हायरस'सारखा कधी झपाटला जातोय... कधी 'पाय सोडूनी जळात बसलेल्या औदुंबरासारखा' गुढाकडे ओढला जातोय... कधी मनामध्ये विचारांचा कोलाहल घेऊन कवितांमधून व्यक्त होत जातोय...
आयुष्याचा ठाव घेतलेल्या सानिका, सलोनी आणि चैतन्यच्या मैत्रीमुळे कॉलेजातले दिवस सोनेरी होऊ पाहतात. पण अचानक काळे ढग
दाटून येतात आणि पुन्हा एकदा करडीकाळी पोकळी तयार होते.
या काळ्या पोकळीत त्यांचे त्यांचे ते ढगांसारखे विरून जातात.
मग पुन्हा उरते फक्त पोकळी. उदास... अटळ ! खाता-पिता-झोपता-उठता-भोगता ही उदासी समीरचा पिच्छा करत राहते. त्याला छळते, त्रास देते आणि जगवतेही !
कॉलेजमधल्या शुभ्र आठवणींच्या कॅनवासवरचे... समीरच्या अंतरंगातले... असे हे भन्नाट बोल्ड काळेकरडे स्ट्रोक्स !
Additional Information
Publications : रोहन प्रकाशन ( Rohan Prakashan )
Author : Pranav Sakhdeo लेखक : प्रणव सखदेव
Binding : Paperback
ISBN No : 9789386493491
Language : मराठी ( Marathi )
Weight (gm) : 256
Width : 14
Height : 2
Length : 22
Edition : 1
Pages : 219