श्रीराम, श्रीकृष्ण, शिवाजी महाराज, अकबर बिरबल, विक्रम वेताळ, धूर्त कोल्हा, चिऊताई, परी राणी हे सगळे आठवतात का ?
तरुणपणी मित्र मैत्रिणी, मध्यम वयात पैसा आणि संपत्ती आणि वृद्धापकाळात ठणठणीत तब्येत हे जितकं महत्वाचं तितकंच लहानपणी ऐकायला मिळालेल्या गोष्टी ह्या महत्वाच्या.
गोष्टी, कथा ह्यांचं महत्व आणि आपल्यावर त्यांचा होणार प्रभाव हे आपल्या पूर्वजांनी खूप आधीच ओळखला होत. म्हणूनच रामायण, महाभारत, विविध पुराणं, पंचतंत्र, इसापनीती हा वारसा, खजिना ते आपल्यासाठी ठेऊन गेलेत. काही लोकं आपल्या धर्मग्रंथात लिहितात 'जुगार हराम आहे, धर्म पाळणाऱ्यांसाठी जुगार खेळणे वर्ज आहे.' तेच आपले पूर्वज आपल्याला धर्मराज युधिष्ठीर आणि नल राजाच्या गोष्टी सांगतात, त्या ऐकून आपण आपल्या सद्सद विवेक बुद्धीने ठरवायचं असतं, जुगार खेळायचा का नाही !

गोष्टी सांगण्याचं काम आपल्याकडे निरंतर सुरूच आहे. गोष्टी सांगणारे लोकं आणि त्यांच्या पद्धती निरनिराळ्या असतात, मग ते हरी भक्त परायण असोत, शाहीर असोत किंवा आपली आजी असो. कथेकऱ्याचे रूप, भाषा, पद्धती, शैली सगळं वेगळं असतं पण सगळे आपल्याला गोष्टीच सांगत असतात आणि त्यांच्या गोष्टीतून आपण नकळत काहीतरी शिकत जातो.                              
काळ बदलला, खाटेवर बसून उघड्या आकाशाखाली, चांदण्या बघत, गोष्टी ऐकणं बंद झालं आणि सोबत न राहणाऱ्या आणि कधीतरी भेटणाऱ्या आजीच्या घरी गेल्यावर मऊ गादीवर ए सी च्या कंफर्ट मध्ये गोष्टी ऐकणं सुरु झालं. काळ बदलला, कथेकरी बदलले पण मला नाही वाटत गोष्टी ऐकण्याची आणि आता बघण्याची मजा काही कमी झाली आहे .आजी आता सोबत नसते, (सोयी साठी म्हणा किंवा इलाज नाही म्हणून म्हणा), त्यामुळे लहानमुलांच्या गोष्टी ऐकणं नक्कीच कमी झालं आहे, आणि त्यासाठी सगळेच हळहळ व्यक्तही करतात. पण प्रौढांच काय ? कथा, कीर्तन जिथे प्रौढांना गोष्टी सांगितल्या जायच्या अशी ठिकाणं शहरी आणि निमशहरी भागात उरली आहेत का ? आणि असतील तर सुशिक्षित म्हंणवणारा शहरी माणूस तिथे अजून जातो का?धर्मराज युधिष्टीराची गोष्ट हि लहानमुलांसाठी तर नक्कीच आपल्या पूर्वजांनी लिहिली नसावी. पंचतंत्र आणिइसापनीती ह्या मुळात प्रौढांसाठीच सांगितलेल्या गोष्टी लहानमुलांसाठी हळहळ व्यक्त करायची आणि स्वतः मात्र कथा,गोष्टीह्यांपासूनदूरजायचं,हा कुठलाशहाणपणा ?अमेरिकन जे करतात ते श्रेष्ठ ह्या तत्वावर सेल्फ हेल्प कडे आपण सहज वळलो, पण त्यात ज्या प्रकारे सूचना दिल्या असतात त्या आपल्याला तंतोतंत पाळता येतात का ? सकाळी ५ वाजता उठा, डायरी लिहा, स्वतःचे गोल्स सेट करा, अमुक करा - तमुक करा इत्यादी. हे सगळं आपण करतो का ? किंबहुना करू शकतो का ? माझा स्वतःच उत्तर नाही असं आहे, कारण कोणी काही उपदेश केला की आपण तो ऐकतो का ? ह्या उलट जुगार खेळाला तर महाभारत घडू शकतं, आता तुम्ही ठरवा काय करायचं ते!काय जास्त प्रभावशाली आहे ? कागदावर लिहिलेले नियम का गोष्टीतून स्वतः घेतलेला बोध ? निर्णय आपल्याला घ्यायचा आहे 


------- नचिकेत शिरे

तळटीप : - जो जे वांछील हि एक कादंबरी आहे, सेल्फ हेल्प पुस्तक नाही.. वाचून बघायची आहे ?